Independence Day : 186 कैद्यांची स्वातंत्र्यदिनी कारागृहातून होणार सुटका

Independence Day : 186 कैद्यांची स्वातंत्र्यदिनी कारागृहातून होणार सुटका

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. मंगळवारी देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृह सचिवाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत. दरम्यान, राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी 9 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती.

भारत सरकारच्या केंद्रीय गृह सचिवाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी 206, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189 बंद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत. वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले पुरूष बंदी, ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 7 बंदी आहेत. तरुण गुन्हेगार 12 ते 21 वर्षे वयात गुन्हा केला, त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या बंद्यांमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com