येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचारी निलंबित; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचारी निलंबित; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Published on

येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याने दोघांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले की, पुणे प्रकरणात येरवडा पोलिस स्थानकातील दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. फक्त दोन कर्मचाऱ्यांचा बळी देऊन पुणे पोलिस आयुक्त यातून सुटू शकत नाही.

पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे. वर पासून खाल पर्यंत सगळे जबाबदार आहे. या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! आणि विशेषत: पुणे पोलिसांची चौकशी झालीच पाहिजे तरच सत्य बाहेर येईल. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com