ताज्या बातम्या
कल्याणमध्ये डेक्कन क्विन पकडताना 2 प्रवाशी रुळावर पडले, एकाचा मृत्यू
कल्याणमध्ये डेक्कन क्वीन पकडताना 2 प्रवाशी रुळावर पडल्याची घटना घडली आहे.
कल्याणमध्ये डेक्कन क्वीन पकडताना 2 प्रवाशी रुळावर पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात. एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. स्टेशनवरील हमालांनी जखमी प्रवाशाला कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळत आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबत नाही. या स्थानकावर एक्सप्रेसचा वेग काहीसा कमी होतो. मात्र धावती एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी खाली पडले.