साताऱ्यात भेकर आणि चौसिंगा या वन्यप्राणीची शिकार प्रकरणी 3 जणांना अटक

साताऱ्यात भेकर आणि चौसिंगा या वन्यप्राणीची शिकार प्रकरणी 3 जणांना अटक

राहत्या घरातून भेकर आणि चौसिंगा या दोन वन्यजीव प्राणी यांचे मुंडके,भेकराचे ताजे मटण,पायाचे खुर ताब्यात घेतलं आहे.

प्रशांत जगताप|सातारा: वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे माची पेठ येथे असलेल्या श्री वास्तू अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या युवराज निमन यांच्या राहत्या घरावर छापा मारून राहत्या घरातून भेकर आणि चौसिंगा या दोन वन्यजीव प्राणी यांचे मुंडके,भेकराचे ताजे मटण,पायाचे खुर ताब्यात घेतलं आहे. यामध्ये युवराज निमन याने ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर यांच्या साहाय्याने मिळून शिकार केले.

नारायण यांच्याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने आज सकाळी 7.30 वाजता भेकर याची शिकार बंदुकीने केली असून भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याचा मटणाचे वाटे करून त्या पैकी आज सकाळी एका भेकराचे मुंडके आणि थोडे मटण हे युवराज निमन याला दिले असून त्याचे कातडे सोलून ओढ्यात लपविले आहे. उरलेले मटणापैकी थोडे मटणाचा वाटा विठ्ठल बेडेकर याला दिला असून उर्वरित सर्व मटण हे नारायण यांनी स्वतःच्या घरी घेऊन आले.

नारायण ह्यांनी सर्व मटण स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून ती पिशवी घरामागील खोलीत शेणीच्या खाली लपवून ठेवले होते. सापडलेले मटण हे सातारामधील बड्याहस्तीला देण्यासाठी लपवून ठेवण्यात आले होते. ते मटण आज रात्री घेऊन जाणार होता असे संशयित नारायण यांनी सांगितले आहे.

या तिन्ही आरोपींना वन विभागाने शिताफीने सातारा आणि ठोसेघर येथून अटक करण्यात आली आहे. वन विभागाने 2 बंदूका एक एअर गण आणि एक सिंगल बोअर बंदूक आणि जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचे चाकू, कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मटण व कातडे हे सर्व घटनास्थळी दाखविले, सर्व गोष्टी वनविभागाने पंचा समोर जप्त केल्या. आरोपीना अटक करण्यात आले असून वन गुन्हा नोंद झाला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com