पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक; रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक; रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाल्याची माहिती मिळत आहे. डॉ. श्रीहरी हरनोर आणि अजय तावरेंना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून डॉक्टरांना अटक करण्यात आली. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रविंद्र धंगेकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रविंद्र धंगेकर ट्विट करत म्हणाले की, पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, याच ससून मध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो, हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत.जे आता हळू हळू जगासमोर येतील. असे रविंद्र धंगेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com