Vijay Wadettiwar : पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे?

Vijay Wadettiwar : पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे?

पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाल्याची माहिती मिळत आहे. डॉ. श्रीहरी हरनोर आणि अजय तावरेंना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून डॉक्टरांना अटक करण्यात आली. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा ' आहे? आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटल मधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे

आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली. हे हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का? ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने ह्या शंकेवर शिक्कमोर्तब केले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पुणे 'हिट अँड रन' प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com