Thief
ThiefTeam Lokshahi

Pune Breaking: माजी उपसरपंचाच्या घरातून तब्बल 28 तोळे सोनं लंपास

शिवणे येथील राहुल नगर या भागात असलेल्या संतोष कदम यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी डल्ला मारला

अमोल धर्माधिकारी | पुणे: शिवणे येथील माजी उपसरपंच संतोष कदम यांच्या घरात घुसून चोरट्यांनी चोरी केली आहे. या चोरीमध्ये एकूण 28 तोळे सोनं व तब्बल दीड लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. शिवणे येथील राहुल नगर या भागात असलेल्या संतोष कदम यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

Thief
साईबाबांच्या चरणी आणखी एका भक्तानं केलं सोनं अर्पण

कश्याप्रकारे केली चोरी?

संतोष कदम यांच्या घरातील सर्व सदस्य पुण्यातील भोसरी येथे चौथभरनी च्या कार्यक्रमासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत दोन चोरट्यांनी चोरी पुर्णत्वास नेली.

घटना सी. सी. टी. व्ही. मध्ये कैद:

दरम्यान ही संपुर्ण घटना सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com