BrahMos Missile : 200 ब्रह्मोस मिसाईल भारतीय नौदलात दाखल होणार
Admin

BrahMos Missile : 200 ब्रह्मोस मिसाईल भारतीय नौदलात दाखल होणार

भारतीय नौदलात लवकरच 200 ब्रह्मोस मिसाईल दाखल होणार आहेत.

भारतीय नौदलात लवकरच 200 ब्रह्मोस मिसाईल दाखल होणार आहेत. त्यामुळे आता भारताचं लष्करी सामर्थ्य वाढणार आहे. भारतीय नौदलाने 200 हून अधिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.काही महिन्यांपूर्वीच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.

इंडो-रशियन मोहिमेअंतर्गत भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मॉस्क्वा नदी या दोन नद्यांच्या नावावरुन या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आलं आहे. या क्षेपणास्त्राची स्ट्राईक रेंज 290 वरुन 400 किमी पेक्षा जास्त आहे. भारत-रशिया यांची संयुक्त कंपनी ब्रह्मोस एअरोस्पेस कडून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे

संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच हा मोठा करार पूर्ण होईल. हा करार सुमारे 20 हजार कोटीचा असेल.ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग ताशी 4321 किमी आहे. हे क्षेपणास्त्र 10 मीटर उंचीवर उड्डाण करु शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com