पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांमुळे शाहिद आफ्रिदी झाला ट्रोल..

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांमुळे शाहिद आफ्रिदी झाला ट्रोल..

Published by :
Saurabh Gondhali
Published on

शाहिद आफ्रिदीने ट्विट केले की, 'शाहबाज शरीफ यांचे पाकिस्तानचे वजीर - ए - आजम झाल्याबद्दल अभिनंदन. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या व्यवस्थापन कौशल्याने पाकिस्ताला सध्याच्या आर्थिक आणि राजनैतिक संकटातून बाहेर काढाल.' शाहिद आफ्रिदीचे हे ट्विट पाकिस्तानातील अनेक नेटकऱ्यांना आवडले नाही. त्यांनी शाहिद आफ्रिदीवर सडकून टीका केली.

ट्विटरवर झाकर यांनी लिहिले की, 'मला कोणतीही निराशा नाही. मी आश्चर्यचकीत देखील झालेलो नाही. मला आशा होतीच की तुम्ही टुकार वक्तव्य कराल.' दुसरीकडे जावेद तारिक लिहितात की, 'आफ्रिदी कायम दोन्ही बाजूंनी खेळतो. अनेक मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आहे.' मीर वसीम लिहितात, लाला तू लाखो लोकांचे ह्रदय तोडू शकत नाहीस. ही पोस्ट डिलीट करून टाक.' शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानातील लोक प्रेमाने लाला असे संबोधतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com