Mandir-Masjid
Mandir-Masjid

Mandir-Masjid : वाराणसीतील मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा, कोर्टाने दिले हे आदेश

17 मे रोजी न्यायालयात अहवाल देणार
Published by :
Team Lokshahi
Published on

मंदिर-मशिदशी (mandir masjid)संबंधित वादात वाराणसीतील ज्ञानवापी मशिदाचा (Gyanvapi masjid survey) वादावर चांगलीच चर्चा सुरु आहे. वाराणसीच्या न्यायालयाने (court) ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी सदस्य आर.पी. सिंह यांना सहभाग घेण्यापासून रोखण्यात आले. सर्वेक्षणाची माहिती लिक केल्याचा आरोप त्यांच्यांवर आहे.

Mandir-Masjid
मंदिर-मशिदचे तीन वाद : एकाच दिवसांत तीन कोर्टाचे निकाल

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळालाचा दावा केला जात आहे. त्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आदेश दिले की, ज्या ठिकाणी शिवलिंग प्राप्त झाले आहे ती जागा तातडीने सील करावी आणि कोणत्याही व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये. त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत न्यायालयाने मोठा निर्णय दिला होता. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले वकील आयुक्त अजयकुमार मिश्रा यांना हटवण्यास न्यायालयाने नकार दिला होता. तसेच 17 मे पूर्वी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सर्वेक्षण सुरु होते. त्याचे काम सोमवारी संपले असून उद्या 17 मे रोजी न्यायालयात सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. दुसरीकडे सर्वेक्षणासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दोन किमीच्या परिघात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com