नंदुरबार : दुचाकीच्या धडकेत परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू
Accident NewsTeam Lokshahi

नंदुरबार : दुचाकीच्या धडकेत परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

वडखुट गावाची रहिवाशी असलेली सुमन गावित असे मयत तरुणीचे नाव असुन ती आयटीआयमध्ये शिक्षण घेत होती.

नंदुरबार | प्रशांत जव्हेरी : आयटीआयचे शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. या विद्यार्थीनीची परीक्षा सुरु असून, आज तिचा शेवटचा पेपर होता. परक्षेला जात असतानाच विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. नवापुर तालुक्यातील नवी सावरट गावाजवळ ट्रॉलीने मोटरसायकलला कट मारल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे महामार्गावर फेकले गेले. यात युवतीचा अंगावरून ट्राला गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Accident News
CM मला तुमच्याशी बोलायचं | राज्य सरकार महागाईतून दिलासा देणार का?

वडखुट गावाची रहिवाशी असलेली सुमन गावित असे मयत तरुणीचे नाव असुन ती आयटीआयमध्ये शिक्षण घेत होती. तिचा आज शेवटचा पेपर असल्याने पेपरसाठी ती घरातुन बाहेर पडली होती. मात्र तिच्यावर काळाने घाला घातला. नवापुर उपजिल्हा रुग्णालयात यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पहावयास मिळाला.

Lokshahi
www.lokshahi.com