2023 वर्षे नाशिककरांसाठी ठरणार आनंदाचे; मिळणार आणखी एक गुड न्यूज

2023 वर्षे नाशिककरांसाठी ठरणार आनंदाचे; मिळणार आणखी एक गुड न्यूज

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिककरांना आनंदाची बातमी मिळत आहे. नाशिकमधून दिल्ली आणि हैदराबाद अशा दोन विमानसेवा सुरू आहेत. मात्र नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना खास गिफ्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले होते. आणखी पाच शहरांत जाण्यासाठी विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 2023 मधील मार्चपासून ही सेवा सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्यात अजून एक आनंदाची बातमी म्हणजे नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित केल्याने परदेशात सुद्धा नाशिकहून जाता येणार आहे.नाशिकचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ घोषित करण्यात आल्याने परदेशातही नाशिकहून उडान करता येणार आहे.मार्चपासूनचे संभाव्य वेळापत्रकही नाशिक विमानतळ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील मोठ्या सात शहरांशी नाशिकची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com