Pune
Pune Team Lokshahi

गणपती विसर्जनासाठी गेलेला तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

तब्बल तीन ते चार तासानंतर मिळाला मृतदेह

विनोद गायकवाड । दौंड: राज्यात मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन पार पडत आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील बोरिएंदी या गावात गणपती विसर्जनासाठी गेलेला 21 वर्षीय तरुण विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. संकेत सदाशिव म्हेत्रे असे मृत तरुणाचे नाव आहे. जवळपास चार तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला आहे.

Pune
वर्दीतील माणुसकी, कचराकुंडीत सापडलेल्या नवजात मुलीचे बोरिवली पोलीस करणार संगोपन

आपल्या पाच ते सहा मित्रांसोबत संकेत हा गणपती विसर्जन करण्यासाठी गावातील विहिरीत गेला होता. घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस उपनिरीक्षक पदमराज गपंले यांनी भेट दिली, पोलीस आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात होता, अखेर पाणबुड्याच्या साहाय्याने तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर संकेत याचा मृतदेह शोधण्यात यश आले. घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

Lokshahi
www.lokshahi.com