Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईत 24 तासांसाठी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद; पाणी जपून वापरण्याचे आदेश
(Navi Mumbai Water Supply ) नवी मुंबईत 24तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या भागात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, गुरुवारी संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच सिडको परिसरातील खारघर आणि कामोठे नोड्समध्येही पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
14 एप्रिल रोजी सकाळी पाणी उपलब्ध असेल मात्र संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही तर 15 मे रोजी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू होईल. 14 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 15 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.