Gold Rate: चार दिवसांत सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घट

Gold Rate: चार दिवसांत सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घट

सोन्याच्या दरात मागील महिन्यात सातत्याने वाढ होत जाऊन विक्रमी पातळीवर हे दर जाऊन पोहोचले होते.
Published by :
Dhanshree Shintre

सोन्याच्या दरात मागील महिन्यात सातत्याने वाढ होत जाऊन विक्रमी पातळीवर हे दर जाऊन पोहोचले होते. सोन्याचे दर हे दिवसागणिक वाढत असल्याने अजून सोन्याचे दर वाढतील या आशेने अनेक ग्राहकांनी वाढत्या दरात सुद्धा सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आलं. मात्र गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर युद्ध जन्य परिस्थिती काहीशी सावरली असल्याने त्याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर झाला असल्याचं सोने व्यावसायिक सांगत आहेत. परिणामी आता ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोने-चांदी यांच्या दरात वाढ होत असताना आता गेल्या चार दिवसांत सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चार दिवसांत सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांनी घट झाली आहे. परिणामी सोने 74300 प्रति दहा ग्रॅमवर आले आहे. यावर रतनलाल बाफना ज्वेलर्स संचालक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज जळगाव चे सुवर्ण नगरीत सोन्याचे दर जी एस टी सह 74300 आहेत. मागील चार दिवस पूर्वी हे दर 76800 इतक्या विक्रमी पातळीवर होते.

दरम्यान, सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही सोन्याचे दर कमी होतील या आशेने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वेट अँड वाच ची भूमिका घेतली असल्याने सोने व्यासैकाना ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com