26/11 Attack Mastermind : तहव्वुर राणाला भारतात आणले; NIA च्या दिल्ली मुख्यालयात होणार चौकशी

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आज भारतात आणण्यात आले
Published by :
Rashmi Mane

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आज भारतात आणण्यात आले आहे. या हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाबला ज्या प्रकारे फाशी दिली, त्याचप्रमाणे तहव्वुर राणालाही फाशी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तहव्वुर राणाला स्पेशल विमानानं अमेरितून दिल्लीमध्ये आणण्यात आलं आहे. 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला आणणारं स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झालं आहे. दिल्लीत हे विमान लँड झालं आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. पालम विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, दोन सफारी, जॅमर, बॉम्ब विरोधी पथक या विमानतळावर दाखल आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com