Tahawwur rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला आज भारतात आणणार असल्याची माहिती मिळत आहे. राणाच्या प्रत्यार्पणाला रोखण्यासाठीची याचिका सोमवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला.
तहव्वुर राणाला 2009 मध्ये एफबीआयने अटक केली होती. तहव्वुरने याचिका दाखल केली होती. स्वतःला पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचे त्याने याचिकेत सांगितले होते, तसेच जर त्याला भारतात पाठवले गेले तर त्याच्यावर अत्याचार होऊ शकतात. असे त्याने सांगितले होते.
तहव्वुर राणाला आज भारतात आणलं जाणार असून एनआयए त्याला ताब्यात घेणार आहे. दीर्घ काळापासून भारत तहव्वूर राणाच्या प्रर्त्यापणाची मागणी करत होता. आज सकाळी त्याला दिल्लीत आणलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याला मुंबई अथवा दिल्लीतील तुरूंगात ठेवण्याची शक्यता आहे.