26/11 मुंबई हल्ल्यातील आझम चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू

26/11 मुंबई हल्ल्यातील आझम चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू

26/11 रोजी झालेला मुंबईवरील दहशतवादी हल्ला आपल्याला त्या कधीही न विसरणाऱ्या वेदना आणि कधीही न भरणाऱ्या जखमेची आठवण करून देतो.
Published by :
Dhanshree Shintre

26/11 रोजी झालेला मुंबईवरील दहशतवादी हल्ला आपल्याला त्या कधीही न विसरणाऱ्या वेदना आणि कधीही न भरणाऱ्या जखमेची आठवण करून देतो. या जखमा घडवणारा या हल्ल्यातील आझम चीमा याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात त्यांच्या मृत्यूची बातमी आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. चीमा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट आणि भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आझम चीमा पत्नी आणि दोन मुलांसह पाकिस्तानातील बहावलपूर येथे राहत होता.

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री कुलाब्याच्या किनाऱ्यावरून पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्करचे 10 दहशतवादी बोटीतून भारतात घुसले होते. ते पूर्णपणे सशस्त्र होते. येथून हे सर्व दहशतवादी दोन गटात विभागले गेले आणि वेगवेगळ्या दिशेने गेले. यापैकी दोन दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे असलेल्या लिओपोल्ड कॅफेला लक्ष्य केले होते, दोन दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसला लक्ष्य केले होते, तर उर्वरित दोन दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ट्रायडेंट ओबेरॉय आणि ताज हॉटेलच्या दिशेने कूच केले होते.

लश्करचा गुप्तचर प्रमुख 70 वर्षीय दहशतवादी आझम चीमा याचा पाकिस्तानातील फैसलाबाद येथे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या गुंड आणि जिहादींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीमानेच 26/11 चा मुंबई हल्ला घडवून आणला होता आणि 2006 मध्ये मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटही घडवून आणले होते. याशिवाय भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग आहे.

दरम्यान, 2011 मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भुतावीवर दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी गोळा करणे आणि दहशतवाद्यांची भरती केल्याचा आरोप करत त्यांच्यावर निर्बंध लादले होते. भुट्टावीने आपल्या भाषणातून दहशतवाद्यांना मुंबईवर हल्ला करण्यासाठी तयार केले आणि फतवे काढले, असे कोषागार विभागाने म्हटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com