19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर 27 तासांचा 'मेगाब्लॉक'

19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर 27 तासांचा 'मेगाब्लॉक'

मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी उद्यापासून दोन दिवस मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी उद्यापासून दोन दिवस मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम सुरु करण्यात येणार आहे. यानिमित्त हा 27 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

"कर्णक पूल पाडण्यासाठी आम्ही 27 तासांचा मेगाब्लॉक घेत आहोत, मात्र आम्ही मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील सेवा निर्धारित वेळेपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करू. आम्ही मुख्य मार्गावरील आमचं काम पूर्ण करण्याचा आणि दुपारी 4 वाजेपर्यंत सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू, तसेच हार्बर मार्गावरील सेवाही आम्ही 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत." असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपनगरीय गाड्या भायखळा ते ठाणे दरम्यान धावतील. रेल्वेनं प्रवाशांना इतर मार्गांवरुन प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई लोकल व्यतिरिक्त, लांब मार्गावरील वाहतूक देखील या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे.

गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com