Special Trains For Holi : चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 28 स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

Special Trains For Holi : चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 28 स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

होळी निमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेने सीएसएमटी ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे ते नागपूर दरम्यान 28 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकिटांचे तपशील.
Published by :
Prachi Nate
Published on

गौरी-गणपती झाले की लगेच कोकणकर तयारीला लागतात ते होळी या सणासाठी. दरवर्षी प्रमाणे यावर्षी होळी 13 मार्च रोजी होळी आहे. होळी म्हणजेच शिमग्याला कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी डिसेंबरपासूनच ट्रेन तसेच बसच्या तिकीट बूक करण्याच्या धावपळीला लागतो. होळीदरम्यानच्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेनासे झाले आहे.

या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी रेल्वेतर्फे स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. शिमग्यानिमित्त कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे ते नागपूर दरम्यान 28 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या स्पेशल ट्रेनच्या तिकिटासाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

जाणून घ्या ट्रेनचे वेळापत्रक काय?

सीएसएमटी ते नागपूर दरम्यान स्पेशल ट्रेन

सीएसएमटी ते नागपूर दरम्यान स्पेशल ट्रेनच्या ८ फेऱ्या होणार आहेत. ०२१३९ सीएसएमटी-नागपूर ट्रेन ९,११,१६ आणि १८ मार्च रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटून नागपूरला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीकरिता ०२१४०ट्रेन ९,११,१६ आणि १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी येणार आहे.

सीएसएमटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेन

सीएसएमटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेनच्या ४ फेऱ्या होणार आहेत. ०११५१ सीएसएमटी-मडगाव स्पेशल ट्रेन ६,१३ मार्च रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटून मडगावला दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे. परतीकरिता ०११५२ ट्रेन ६,१३ मार्च रोजी दुपारी सव्वा दोन वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी येणार आहे.

एलटीटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेन

एलटीटी ते मडगाव दरम्यान ४ फेऱ्या धावणार आहेत. ०११२९ एलटीटी-मडगाव ट्रेन १३ आणि २० मार्च रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता पोहोचेल. परतीकरिता ०११३० ट्रेन मडगाव येथून १४ आणि २१ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता सुटून एलटीटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com