Vidhansabha
Vidhansabha

विधानसभेचे 288 आमदार आज शपथ घेणार

आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू

  • विधानसभेचे 288 आमदार आज शपथ घेणार

  • आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार

महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. राज्यातील 288 आमदारांना विधानसभेकडून अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले असून विधानसभेचे 288 आमदार आज शपथ घेणार आहेत.

भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी काल हंगामी अध्यक्ष म्हणून राजभवनात जाऊन शपथ घेतली. कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून राज्यपालांच्या दोन्ही सभागृहातील अभिभाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com