Girish Mahajan on electionsTeam Lokshahi
ताज्या बातम्या
येत्या 3-4 दिवसांत आचारसहिंता लागू शकते-गिरीश महाजन
आजची कॅबिनेट बैठक ही शेवटची असू शकते असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या 3-4 दिवसांत आचारसहिंता लागू शकते असं विधान महाजन यांनी केलं आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून 80 निर्णयांचा धडाका लावण्यात आला. त्यामुळे लवकरात लवकर आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चांना अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी दुजोरा दिला आहे. आजची कॅबिनेट बैठक ही शेवटची असू शकते असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या 3-4 दिवसांत आचारसहिंता लागू शकते असं विधान महाजन यांनी केलं आहे.