पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी; गुन्हा दाखल
Admin

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी; गुन्हा दाखल

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी उकळल्याची घटना घडली आहे.

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी उकळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधी संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये द्या म्हणून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. दरम्यान राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्या दोघांनी "कॉल मी" नावाचे एक ॲप डाऊनलोड करून त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲप द्वारे पुण्यातील व्याव्यासिकला फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत. यासाठी ३ कोटी रुपये द्या असे सांगून खंडणी मागितली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com