ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील खासदार जाधव यांचा पुन्हा नवा गौप्यस्फोट

ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील खासदार जाधव यांचा पुन्हा नवा गौप्यस्फोट

बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे.

संदीप शुक्ला, बुलढाणा

बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.

याअगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल असा दावा खासदार जाधव यांनी केला असून 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com