नवी मुंबई एपीएमसीत 300 टन बटाटा सडला

नवी मुंबई एपीएमसीत 300 टन बटाटा सडला

नवी मुंबई एपीएमसीत 300 टन बटाटा सडला असल्याची माहिती मिळत आहे.

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबई एपीएमसीत 300 टन बटाटा सडला असल्याची माहिती मिळत आहे. अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे आणि याचाच फटका बटाट्यांना बसला आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठवलेला बटाटा सडू लागला आहे. सडलेले बटाटे मार्केटमध्ये उघड्यावर फेकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

7 दिवसांत जवळपास 6 हजार गोण्या बटाटा सडल्याची माहिती मिळत आहे. बटाटा गोळा करण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांची गर्दी झाली आहे. खराब वातावरणामुळे बटाटा सडल्याचा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com