इंदूरच्या मंदिर दुर्घटनेत आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू
Admin

इंदूरच्या मंदिर दुर्घटनेत आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी घटना घडली आहे. इंदूरमध्ये मंदिरातील विहिरीचे छत कोसळून माणसं आत पडली. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी NDRF आणि SDRF ची पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. लोकांना मंदिराजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

इंदूरच्या मंदिर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून आत्तापर्यंत या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. लोक पूजा आणि आरती करत होते. मंदिरात एक पायरी विहीर होती, त्यावर १० वर्षांपूर्वी छत टाकण्यात आले होते. पूजेच्या वेळी 20-25 लोक पायरीच्या छतावर उभे होते, त्यावेळी छत कोसळल्याने सुमारे 20-25 जण विहिरीत पडले. ही पायरी विहीर 50 फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com