पुण्यातील नदीपात्रात आढळले पाच दिवसांत दोन महिलांसह ४ मृतदेह
पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रात पाच दिवसांत चार मृतदेह सापडले आहे. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. पुण्यातील नदीपात्रात मागील पाच दिवसांत चार मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहांमध्ये पती-पत्नी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, “दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात बुधवार रोजी स्थानिक मच्छीमार मासेमारी करत होते. त्यावेळी त्यांना एका स्त्रीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर, शुक्रवारी पुरुषाचा मृतदेह आढळला. 21 तारखेला पुन्हा एका स्त्रीचा मृतदेह आढळला असून, 22 तारखेला पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळला. असे एकूण 5 दिवसात 4 मृतदेह आढळले” अशी माहिती त्यांनी दिली आहे.