या ४ उमेदवारांना बसला 'नोटा'चा फटका
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. महायुतीला घवघवीत यश मिळालं. महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम मशिनवर तसेच निवडणूक आयोगावर शंका व्यक्त केली जाऊ लागली. तर दुसरीकडे 'नोटा'मुळे काही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विधानसभा निवडणुकीत महामुंबईतील ६७ मतदारसंघांपैकी ११ मतदारसंघांतील मतदारांनी तिसऱ्या क्रमांकाची पसंती 'नोटा'ला दिली आहे. उमेदवाराबाबत नाराजी आणि नापसंती दर्शविण्यासाठी नोटा हा पर्याय आहे. त्याचा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या मनीषा वायकर आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक, फहाद अहमद, महादू बरोरा अशा ४ उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. या चार पराभूत मोठा फटका बसला आहे. या चार पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघात जितकी मते नोटाला मिळाली आहेत. त्यापेक्षा कमी मतांनी त्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
मनीषा वायकर यांचा १,५४१ मतांनी पराभव, २८८७ जणांची नोटाला पसंती
शिंदेसेनेचे खा. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा अनंत (बाळा) नर यांनी १,५४१ मतांनी वायकर यांचा पराभव केला. २८८७ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. ही मते वायकर यांना मिळाली असती तर त्यांचा विजय निश्चित होता.
फहाद अहमद यांचा ३३७८ मतांनी पराभव, ३,८४४ जणांची नोटाला पसंती
अणुशक्तीनगरमध्ये अजित पवार गटाच्या सना मलिक ४९,३४१ मते मिळवून विजयी झाल्या, तर शरद पवार गटाचे फहाद अहमद यांना ४५,९६३ मते मिळाली. येथे नोटाची मते ३,८४४ इतकी आहेत. मलिक आणि अहमद यांच्यामधील मतसंख्येचा फरक ३३७८. इतका आहे
पांडुरंग बरोरा यांचा १,६७२ मतांनी पराभव, ४,८७२ जणांची नोटाला पसंती
शहापुरात अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांनी ७३,०८१ मते घेऊन शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांचा १,६७२ मतांनी पराभव केला. पांडूरंग बरोरा यांना ७१,४०९ मते मिळाली, तर नोटाला ४,८७२ मते मिळाली आहेत. येथेही नोटांमुळे पांडूरंग बरोरांचे नुकसान झाले आहे.
संदीप नाईक यांचा ३७७ मतांनी पराभव, २,५८८ जणांची नोटाला पसंती
नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात बिग फाईट होती. भाजपच्या म्हात्रे यांनी केवळ ३७७ मतांनी नाईक यांचा पराभव केला. म्हात्रे यांना ९१,४२९ मते, तर शरद पवार गटाचे नाईक यांना ९१,०१४ मते मिळाली आहेत. संदीप नाईक यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या नोटाला मात्र २,५८८ मते मिळाली आहेत.