Satara
SataraTeam Lokshahi

साताऱ्यात बेकायदेशिर शस्त्र बाळगणाऱ्या 4 इसमांकडून 4 लाख 18 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हयामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्याने पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून शिवराज फाटा
Published by :
shweta walge
Published on

प्रशांत जगताप, सातारा: सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हयामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्याने पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून शिवराज फाटा परिसरात देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्याकरीता 2 व्यक्ती येणार असल्याची बातमी समजल्याने पोलिसांच्या तपास पथकाने शिवराज फाटा परिसरात सापळा लावत यामाहा गाडीसह संशयित आरोपी गणराज वसंत गायकवाड, अदित्य तानाजी गायकवाड यांना पकडून त्यांच्या ताब्यातून 2 पिस्टल, 6 काडतूस, एक मोबाईल आणि यामाहा गाडी असा एकूण 2 लाख 16 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचे आणखी दोन साथीदार वाढेफाटा येथे असून त्यांच्याकडेही दोन पिस्टल असल्याची माहिती तपास पथकास मिळाल्याने ताब्यातील व्यक्तींसह वाढेफाट येथे जावून तेथे दोन व्यक्ती आणि स्वप्नील संजय मदने यांना पकडून त्यांच्या ताब्यातून 2 पिस्टल, 2 काडतूस, एक मॅगझीन, 2 मोबाईल आणि एक स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 2 लाख 2 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.पकडलेल्या 4 जणांकडून एकूण 4 पिस्टल, 8 काडतूस, 1 मॅगझीन, 3 मोबाईल हॅन्डसेट,दोन मोटार सायकल असा एकुण 4 लाख 18 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय.

Satara
ओरोस ग्रामपंचायतीवर भाजपचा सरपंच
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com