दिल्लीमध्ये 4 मजली इमारत कोसळली; 3 कामगारांचा मृत्यू

दिल्लीमध्ये 4 मजली इमारत कोसळली; 3 कामगारांचा मृत्यू

6-7 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील आझाद मार्केट परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर, 6-7 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलासह अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

माहितीनुसार, आझाद मार्केट परिसरातील शीश महालमधील एका इमारतीत बांधकाम सुरू होते. ही इमारत अचानक कोसळली. सकाळी 8.50 वाजेदरम्यान ही घटना घडली असून यामध्ये अनेक मजूर अडकले असण्याची भीती आहे. आतापर्यंत ३ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक व अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने बचावकार्य सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com