राज्यातील 40 हजार प्राथमिक शाळा आज बंद राहणार
भारत गोरेगावकर, रायगड
राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळा आज बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक आज एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनावर जाणार आहेत. पावणे दोन लाख प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर जाणार आहेत.
सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे.
शासनाने हे दोन्ही निर्णय रदद करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्या असून या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली मात्र याबाबत निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षक आंदोलनात उतरले आहेत.
पावणेदोन लाख शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असून अंदाजे 40 हजार शाळा आज बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहेत.