Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रकाश आंबेडकर यांचे 5 महत्त्वाचे संकल्प

आज 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला भगवान गौतम बुद्धांची जयंती असते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी 5 महत्त्वाचे संकल्प सांगितले आहेत.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही स्मरण करतो, ज्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून केवळ आत्ममुक्तीचा मार्ग निवडला नाही तर कोट्यवधी लोकांना आदर आणि समानतेचा मार्गही दाखवला. बाबासाहेबांसाठी बौद्ध धर्म हा एक वैज्ञानिक मार्ग होता आणि त्याचबरोबर असमानतेविरुद्धची क्रांतीही होती.

आज, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, मी सर्व बौद्ध मित्रांना महाबोधी मुक्ती चळवळीत सहभागी होण्याचे आणि खालील संकल्प करण्याचे आवाहन करतो -

मी बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करेन

मी बुद्धांनी शिकवलेल्या पारमित्यांचे पालन करेन

मी बुद्ध आणि त्यांच्या धम्माची तत्वे आणि शिकवणूक यांचा प्रसार, प्रचार करीन.

मी बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालेन आणि त्याचा प्रचार करेन.

मी आंबेडकरी नसलेल्या पक्षांना पाठिंबा देणार नाही किंवा मतदान करणार नाही. असे त्यांनी ट्विट करत संकल्प केले आहेत.

Prakash Ambedkar
Buddha Purnima 2025 : बुद्ध पौर्णिमा, जाणून घ्या तिथी आणि ‘या’ दिवसाचं महत्त्व
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com