Jitendra Awhad
Jitendra Awhad Team Lokshahi

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 500 पानी आरोपपत्र दाखल

अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 5 एप्रिल 2020 रोजी आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांनी बंगल्यावर नेऊन करमुसेंना मारहाण केल्याचा आरोप आहे.

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अनंत करमुसे नावाच्या व्यक्तीचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. आव्हाड यांच्यावर 120 ब आणि 364 अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com