दिनविशेष 6 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 6 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 6 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 6 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१०: भारतातीलजम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.

१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.

१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.

१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.

१९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.

१९४५: जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.

१९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.

१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.

१९१४: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

आज यांचा जन्म

१९७५: शेखर गवळी - भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) (निधन: १ सप्टेंबर २०२०)

१९७०: एम. नाईट श्यामलन - भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक

१९६५: विशाल भारद्वाज - भारतीय चित्रपट दिग्दर्शक

१९५९: राजेंद्र सिंग - भारतीय पर्यावरणवादी

१९२५: योगिनी जोगळेकर - भारतीय लेखिका (निधन: १ नोव्हेंबर २००५)

१९२२: ओमप्रकाश मल्होत्रा - पंजाबचे २५ वे राज्यपाल (निधन: २९ डिसेंबर २०१५)

१९००: सीसिल हॉवर्ड ग्रीन - टेक्सास इन्स्ट्रूमेंटचे स्थापक (निधन: ११ एप्रिल २००३)

१८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग - पेनिसिलीन औषधाचे निर्माते स्कॉटिश शास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ११ मार्च १९५५)

१८०९: लॉर्ड टेनिसन - इंग्लिश कवी (निधन: ६ ऑक्टोबर १८९२)

दिनविशेष 6 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Happy Friendship Day Wishes; 'फ्रेंडशिप डे' विश करण्यासाठी स्टेटसवर ठेवा 'हे' सुंदर मॅसेज

आज यांची पुण्यतिथी

२०२२: तामो मिबांग - भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १ जुलै १९५५)

२०२२: साजिद पट्टलम - भारतीय अभिनेता

२०१९: सुषमा स्वराज - दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या - पद्म विभूषण (जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)

२००१: कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुखआधार

२००१: आधार कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुख

१९९९: कल्पनाथ राय - राजकीय नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१)

१९९७: बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य - भारतीय आसामी साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)

१९९१: शापूर बख्तियार - ईराणचे ७४ वे पंतप्रधान (जन्म: २६ जून १९१४)

१९८५: फोर्ब्स बर्नहॅम - गयानीज वकील आणि राजकारणी, गयाना देशाचे २रे अध्यक्ष (जन्म: २० फेब्रुवारी १९२३)

१९७८: पोप पॉल (सहावे) - (जन्म: २६ सप्टेंबर १८९७)

१९६५: वसंत पवार - संगीतकार

१९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com