Tom Cruise : टॉम क्रूझ पुन्हा विवाहबंधनात!
Tom Cruise : टॉम क्रूझ पुन्हा विवाहबंधनात! 63 वर्षीय स्टार करणार 37 वर्षीय अ‍ॅना डी आर्मासशी अंतराळात लग्नTom Cruise : टॉम क्रूझ पुन्हा विवाहबंधनात! 63 वर्षीय स्टार करणार 37 वर्षीय अ‍ॅना डी आर्मासशी अंतराळात लग्न

Tom Cruise : टॉम क्रूझ पुन्हा विवाहबंधनात! आपल्या वयाहून अर्धा वयाच्या मुलीशी करणार लग्न

हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझ पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे आणि यावेळी त्याचं लग्न पूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Tom Cruise Wedding : हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझ पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे आणि यावेळी त्याचं लग्न पूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे. 63 वर्षीय क्रूझ आपल्या पेक्षा तब्बल 26 वर्षांनी लहान अभिनेत्री अ‍ॅना डी आर्मास (Ana de Armas) हिच्याशी लग्न करणार आहे. विशेष म्हणजे हे लग्न पृथ्वीवर नव्हे, तर थेट अंतराळात (Space Wedding) पार पाडण्याची योजना आहे. त्यामुळे हे लग्न जगातील पहिलं ‘स्पेस मॅरेज’ ठरण्याची शक्यता आहे.

टॉम आणि अ‍ॅना यांच्या नात्याच्या अफवा 2025 च्या सुरुवातीपासून चर्चेत आहेत. एप्रिल महिन्यात ते लंडन ते माद्रिद या हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान एकत्र दिसले, तर जुलैमध्ये अमेरिकेतील व्हरमाँट येथे हातात हात घालून फिरताना त्यांचे फोटो व्हायरल झाले. नासासोबत काम केलेल्या आणि ‘मिशन इम्पॉसिबल’ मालिकेत धाडसी स्टंट्स करणाऱ्या टॉमचा साहसी स्वभाव पाहता, हे लग्न अंतराळात करण्याची कल्पना त्याच्यासाठी अगदी नैसर्गिक वाटते. चाहते या लग्नाला “मिशन इम्पॉसिबल वेडिंग” म्हणत सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

अ‍ॅना डी आर्मास ही क्यूबन-अमेरिकन अभिनेत्री असून तिने “Knives Out” (2019), “No Time To Die” (2021) आणि “Blonde” (2022) सारख्या चित्रपटांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली. सध्या ती टॉमसोबत येणाऱ्या “Deeper” या सुपरनॅचरल थ्रिलरमध्ये झळकणार आहे. दोघांमधील व्यावसायिक केमिस्ट्रीमुळेच त्यांचे वैयक्तिक नाते अधिक दृढ झाल्याचे बोलले जाते.

टॉम क्रूझ याआधी तीन वेळा विवाहबद्ध झाला होता. मिमी रॉजर्स (1987–1990), निकोल किडमन (1990–2001) आणि केटी होम्स (2005–2012). मात्र, त्याची कोणतीच जोडी दीर्घकाळ टिकली नाही. आता अ‍ॅनासोबतचं त्याचं हे लग्न त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. या लग्नाला हॉलिवूड आणि जगभरातील चाहते उत्साहाने पाहत आहेत. जर सर्व काही नियोजनानुसार झालं, तर टॉम आणि अ‍ॅना हे मानव इतिहासातील पहिले ‘अंतराळात लग्न करणारे जोडपे’ ठरतील आणि तेच त्यांच्या प्रेमकहाणीचं ‘मिशन इम्पॉसिबल’ यश ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com