धक्कादायक! भीमा नदीपात्रातील ७ जणांची आत्महत्या नव्हे  हत्याकांडच

धक्कादायक! भीमा नदीपात्रातील ७ जणांची आत्महत्या नव्हे हत्याकांडच

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली होती.

विनोद गायकवाड, पुणे- दौड

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता धक्कादायक माहीती समोर येतीय या 7 ही जणांचे खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मयताच्या 4 चुलत भावांनी 7 जणांचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोहन आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला. 

आरोपीच्या मुलाचा अपघात करून मुलाचा खून केल्याच्या संशयातून 7 जणांची हत्या करून आरोपींनी भीमा नदीत मृतदेह फेकल्याचे समोर आले आहे. 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. याबाबत अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत. अंधश्रद्धेतून हे हत्यांकड घडल्याचं म्हटलं जात आहे. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन मुले यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. 

पोलिसांना १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांत पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात चार मृतदेह मिळून आले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यानंतर केलेल्या शोधकार्यात तीन मुलांचे मृतदेह सापडले. पवार कुटुंब हे मूळचं अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधील आहे. 17 जानेवारी रोजी या कुटुंबाने दौंड तालुक्यातील पारगाव इथल्या नदीत आत्महत्या केल्याचे सांगितलं जातं होतं. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आलं होतं. त्यावर पोलिसांनी तपास केला असता मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com