प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण

प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण

प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण करण्यात आले आहे. सरनाईक आपल्या कुटुंबीयांसोबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यांनी त्यावेळी ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले.

प्रताप सरनाईक म्हणाले की, “मी पहिल्या मुलाच्या लग्नावेळी ५१ तोळ्याचा आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी २१ तोळ्याचा हार घालेन असं म्हटलं होतं. दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. कोरोनामुळे मंदिरं बंद होती, तसंच इतर संकटं आमच्यावर होती त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण आता वेळ मिळाल्याने आम्ही आलो.

तसेच त्यांनी सांगितले की, “तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसंच दोन्ही नातवंडांचं जायवळ करायचं होतं. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असं म्हटलं होतं. मध्यंतरी कोरोना काळ आणि काही संकटांमुळे येता आलं नव्हतं. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेलं नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो. असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com