Cabinet Meeting Decision : दहा जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Cabinet Meeting Decision : दहा जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, २९ जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आला.
Published by :
Rashmi Mane
Published on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, २९ जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. यामध्ये विधि व न्याय, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार व पणन विभागांच्या निर्णयांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येणार आहे. या अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या 8 निर्णयांवर शिक्कामोर्तब -

1. राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण 1 हजार 902 पुरस्कार दिले जाणार.

2. 'उमेद'- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार.

3. 'ई-नाम' योजनेची प्रभावी अंमलबजावणी. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

4. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार.

5. पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना. या न्यायालयांसाठी पदांना मंजूरी देण्यात आली आहे.

6. वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी 231 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता.

7. वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी 197 कोटी 27 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता.

8. महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना अॅव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा

Cabinet Meeting Decision : दहा जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Priyanka Gandhi Vadra : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून प्रियांका गांधी वाड्रा यांचा सवाल गृहमंत्र्यांना सवाल
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com