Chandrapur जिल्ह्यात मागील 24 तासात वीज पडून ८ ठार, नऊ जखमी

Chandrapur जिल्ह्यात मागील 24 तासात वीज पडून ८ ठार, नऊ जखमी

चंद्रपूरमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
Published on

अनिल ठाकरे, चंद्रपूर

जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास,आणि आज सकाळी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभूर्णा, कोरपना व गोंडपिंपरी तालुक्यात वीज कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५), गोविंदा लिंगू टेकाम (५६), अर्चना मोहण मडावी (२७), पुरुषोत्तम अशोक परचाके (२५), कल्पना प्रकाश झोडे (४०), अंजना रूपचंद पुस्तोडे (५०), योगिता खोब्रागडे (३५) आणि रंजन बल्लावार यांचा समावेश आहे. ब्रम्हपुरी जवळील मौजा बेटाळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५) या आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतावर काम करून घरी परत येत होत्या. वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com