नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 8 जणांचा मृत्यू
नागपूरच्या मेयो रुग्णालयात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्येही मृत्यूचं तांडव झालं आहे. 24 तासांमध्ये मेडिकल आणि मेयोत 25 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.
मेडिकल आणि मेयो हे विदर्भासह मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगाना या राज्यातील रुग्णांना आणले जाते. या रुग्णासाठी मेडिकलला अधिकृत एक हजार चारशे एक ट्रॉमा आणि अतिरिक्त मिळून 1800 खाटा आहे तर मेयोत 830 खाटा आहेत. मागील 24 तासात आठ जणांना खाजगी रुग्णालयातून मेडिकलमध्ये रेफर केले यानंतर काही तासातच हे रुग्ण मेडिकलमध्ये दगावले.
दोन ऑक्टोबरला चोवीस तासात तब्बल सोहळा आणि मेयोत नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात नवजात शिशुसह विविध वयोगटातील हे रुग्ण होते. दररोज मेडिकल मध्ये 13 रुग्णांचा मृत्यू होतो विविध कारणांनी तर मेयो मध्ये आठ ते नऊ हा नियमित आकडा आहे.