ताज्या बातम्या
विधानपरिषदेसाठी महायुतीकडून 9 उमेदवारी अर्ज दाखल; नाना पटोलेंची महायुतीला 1 अर्ज मागे घेण्याची विनंती
विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्ष विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. विधानपरिषदेसाठी महायुतीकडून 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आमच्याकडे तीन उमेदवार यांचे मत आहेत. म्हणून आम्ही तीन उमेदवारांचा फॉर्म भरलेला आहे. जे काही महायुतीकडून 9 फॉर्म आलेलं आहेत.
यासोबतच ते म्हणाले की, त्यांना आमची विनंती राहणार आहे की, तुम्ही तुमचा एक फॉर्म काढून घ्या आणि बिनविरोध निवडणूक करा. ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे. असे नाना पटोले म्हणाले.