ताज्या बातम्या
लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू
लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू
विशाल मोरे, नाशिक
लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खोबळा दिगरच्या पार नदीवर ही घटना घडली.
नदीला पाणी जास्त असल्याने तो बाईक नदीकाठी लावून नदी पार करत असताना, पाय घसरुन तो नदीच्या पात्रात पडला. पाण्याच्या अंदाज न आल्याने पाय घसरुन नदीच्या पात्रात पडल्याने तो पुराच्या पाण्यात चार ते पाच किलोमीटर वाहून गेला.
गुजरात राज्यातील केळधा येथे हा तरुण मुलगी पाहण्यासाठी गेला होता. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.