Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन

Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन

पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वरुप विष्णु जाधव (वय 28), हे स्वारगेट पोलीस लाईनमधील राहिवासी असून, त्यांनी स्वतःच्या राहत्या खोलीत गळफास लावून जीवन संपवलं. ही घटना दुपारी सुमारे 2.30 च्या सुमारास घडली.

स्वरुप जाधव हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील रहिवासी होते. 2023 मध्ये ते पुणे पोलीस दलात दाखल झाले होते. सध्या ते स्वारगेट पोलीस लाईनमधील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहात होते. पोलिसांना 112 हेल्पलाइनवरून दुपारी 2.11 वाजता याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर खडक पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

स्वरुप जाधव यांनी खोलीतील खिडकीच्या अँगलला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. सुसाईड नोट मिळाली नसली तरी त्यांचा मोबाईल तपासण्यात येत आहे, त्यामध्ये आत्महत्येमागचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, मोबाईलमधील डेटाचे विश्लेषण सुरू आहे. या घटनेने पुणे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. स्वरुप जाधव यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय, हे शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही घटना अनेक प्रश्न निर्माण करत असून, एक तरुण पोलीस कर्मचाऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण होतं, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा

Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन
MNS Leader Video Viral : मनसे नेत्याच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com