राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लागला अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा बॅनर
Admin

राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लागला अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा बॅनर

निलेश लंकेंनी राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं होते.

निलेश लंकेंनी राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं होते. “आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचं काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं आहे. मी तर बऱ्याच भाषणांत सांगतो, की अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आहे. जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील. असे निलेश लंकेनी म्हटले आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. वारंवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे बॅनर लावण्यात येत आहेत. आगामी निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण अशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा अजित दादा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहेत. याचसोबत काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखिल जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com