अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ई पासबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ई पासबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. मोठ्या उत्साहात आता नवरात्रोत्सही साजरी करण्यात येणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत.

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. मोठ्या उत्साहात आता नवरात्रोत्सही साजरी करण्यात येणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता कोरोना काळात ई पास भक्तांसाठी सक्तीचा करण्यात आला होता. मात्र यंदा मंदिर प्रशासनाकडून ई पासबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ई पासची आवश्यकता नसणार आहे. ई पासची सक्ती उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवाला करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने निर्बंधमुक्त वातावरणातल नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com