कांदिवलीतील शाळेला बॉम्बची धमकी, पोलिसांना माहिती; विद्यार्थ्यांना घरी पाठवलं

कांदिवलीतील शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कांदिवलीतील शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. केईएस इंटरनॅशनल स्कूलमधील रुममध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आला. याबाबत शाळा प्रशासनाने पोलिसांना ही माहिती दिली आहे. सदर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात आता बंदोबस्त ठेवण्यात आला असून यासंदर्भातील अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com