कसब्यातील भाजपा उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल
Admin

कसब्यातील भाजपा उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल

कसब्यातील भाजपा उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसब्यातील भाजपा उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचं उपरणं घालून मतदान केंद्रावर गेल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून रासनेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल मतदान पार पडले आणि या मतदानासाठी हेमंत रासने मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर भाजपाचे उपरणं घालूनत त्यांनी मतदान केलं. याविरोधात विरोधकांनीसुद्धा आक्षेप नोंदवला होता.

या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखिल करण्यात आली होती. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com