खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Admin

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन होताना पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीतर्फे खासदार इम्तीयाज जलील यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे.

इम्तियाज जलील यांनी काल (9मार्चला) शहरात कँडल मार्च काढला होता.पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीपण मार्च काढण्यात आला. या प्रकरणी जलील यांच्यासह 1500 लोकांवर जमावबंदी आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्च काढू नयेत अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र तरीही जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com