संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादंवि कलम 171( क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर येथे सभा झाली होती.

या सभेत त्यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com