मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध केल्याच्या रागातून डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला मराठा आंदोलकांनी काळे फासले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध केल्याच्या रागातून डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला मराठा आंदोलकांनी काळे फासले होते. आधी त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासले.

याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरला काळे फासल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झुंजार छावा संघटनेच्या अध्यक्षांनी डॉक्टरला काळे फासले होते. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्ये आणि मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com